सध्या राज्यभरात Ladki Bahin Yojana चर्चेत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल आहे. जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंत, एकूण ५ हप्त्यांमध्ये ७,५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे आता बँक खात्यांमध्ये जमा होत आहेत. जर तुम्हाला अजून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाले नसतील, तर ते १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत.
याच दरम्यान, सोशल मीडियावर एक अफवा जोर धरत आहे की लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींना राज्य सरकारकडून मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे. या चर्चेने महिलांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे, परंतु यामागे खरे काय आहे, ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे
मोबाईल गिफ्टची सत्यता:
राज्य सरकारने ladki bahin yojana मध्ये मोबाईल गिफ्ट देण्याचा कोणताही शासन निर्णय (GR) काढलेला नाही. सध्या सोशल मीडियावर प्रसारित होणारी ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. राज्य सरकारने मोबाईल गिफ्टसाठी कोणतीही अधिकृत घोषणा, वेबसाइट किंवा लिंक जारी केलेली नाही.
फसवणूक करणारे संदेश आणि फेक लिंकचा उपयोग करून काहीजण महिलांना फसवत आहेत. ‘मोबाईल मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा’ असे संदेश महिलांना मिळत आहेत, जे फसवे आहेत. या फेक लिंकचा वापर केल्यामुळे महिलांचे बँक खात्यातील पैसेही चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे सर्व महिलांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
महिलांनी घ्यावयाची काळजी:
महिलांनी कोणत्याही अर्जासंबंधी माहिती मिळवताना अधिकृत सरकारी संकेतस्थळाचीच खात्री करावी. राज्य सरकारने कोणतीही योजना सुरू केल्यास, त्यासंबंधी आधी शासन निर्णय (GR) काढला जातो. लाडकी बहीण योजनेच्या मोबाईल गिफ्ट संदर्भात कोणताही GR काढलेला नसून, सोशल मीडियावर चाललेली चर्चा पूर्णपणे अफवा आहे.
महिलांनी या फसव्या संदेशांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि कोणत्याही लिंकमध्ये फसवू नये. जर शासनाच्या कोणत्याही योजनेविषयी माहिती हवी असेल, तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन खात्री करणेच योग्य आहे.
लक्षात ठेवा
लाडकी बहीण योजनेत मोबाईल गिफ्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर फोफावत आहे, पण याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय निघालेला नाही. महिलांनी फेक संदेशांपासून सतर्क राहून फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे