Ladki Bahin Yojana Last Date Extended: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वाची घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्यासाठी आता 15 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत दिली गेली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 होती, मात्र महिलांकडून आलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे सरकारने योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जदार महिला अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच अर्ज भरू शकतील. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा या मुदतवाढीमध्ये दिली गेलेली नाही. ही योजना ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली असून, महिलांनी या योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.Ladki Bahin Yojana Last Date Extended
योजनेची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली असून, सुरुवातीला 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरण्याची वेळ दिली होती. त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली होती, आणि त्यानंतर सप्टेंबर अखेरीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देत 15 ऑक्टोबर 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराचे हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
योजनेसाठी अटी:
- अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवाशी असावी.
- विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना अर्ज करण्याची संधी आहे.
- यापूर्वी लाभार्थी महिलांचा वय 21 ते 60 वर्षे होता, मात्र आता 21 ते 65 वर्षे वयोगटाला मान्यता देण्यात आली आहे.
- लाभ घेणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अजूनही वेळ आहे. त्यामुळे पात्र महिलांनी 15 ऑक्टोबरच्या आतच अर्ज सादर करावा.