लाडकी बहीण योजनेत DBT Seeding कशी तपासाल ?

Ladki Bahin yojana DBT Seeding : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) Seeding करणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते DBT Seeding साठी सक्रिय असेल, तरच तुम्हाला योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळतील.

जर तुमच्या बँक खात्याचे नाव DBT Seeding यादीत दाखवत असेल आणि ते सक्रिय असेल, तर योजनेचे पैसे तुमच्या खात्यात थेट पाठवले जातील. शासनाने सांगितलेल्या डेट्सनुसार, 30 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत.

महिलांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे थेट जमा होणार असल्याने DBT Seeding सक्रिय असणे अत्यावश्यक आहे. जर DBT Seeding सक्रिय नसेल, तर तुम्ही पात्र असलात तरीही पैसे मिळणार नाहीत.

DBT Status कसे तपासाल

जर तुम्ही अद्याप DBT Status तपासले नसेल, तर खाली दिलेल्या स्टेप्सनुसार ते तपासा

  1. सर्वप्रथम, आधारच्या अधिकृत वेबसाइटवर https://uidai.gov.in ला भेट द्या.
  2. तिथे गेल्यावर ‘Bank Seeding Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.
  4. आधार क्रमांक टाकल्यानंतर CAPTCHA कोड भरा आणि ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा.
  5. तुम्ही आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  6. OTP व्हेरिफाय झाल्यावर तुमचे DBT स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
  7. DBT स्टेटसमध्ये तुमच्या आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल.
  8. जर बँक खाते DBT Seeding मध्ये ‘Active’ असेल, तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.
  9. जर DBT Seeding सक्रिय नसेल, तर लगेच बँकेत जाऊन ते सक्रिय करून घ्या.

हे नक्की लक्षात ठेवा.

फक्त DBT स्टेटस ‘Active’ असलेल्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. जर DBT Seeding सक्रिय नसेल, तर पैसे मिळणार नाहीत, म्हणून लवकरात लवकर बँकेत जाऊन ते सक्रिय करणे आवश्यक आहे.

Ladki Bahin yojana चा लाभ घेण्यासाठी ही सर्व प्रक्रिया महत्वाची आहे. DBT स्टेटस सक्रिय झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतील हे निश्चित आहे

इतरांना शेअर करा.......