Small Business Loan Scheme: महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे ज्याअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. Small Business Loan या योजनेमुळे महिला उद्योजकांना आता मोठा आधार मिळणार आहे. सध्या महिला उद्योजकांच्या संख्येत वाढ होत असली तरी अनेक महिला अपुऱ्या भांडवलामुळे उद्योजक क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत. याच समस्येवर तोडगा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत.
Small Business Loan योजना
उद्योग असो किंवा कृषी, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याचे पाऊल उचलले आहे. या उद्योगिनी योजना अंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे, या योजने अंतर्गत महिलांना कोणतीही गहाणखत न ठेवता बिनव्याजी कर्ज मिळते.
महिला उद्योगिनी योजना म्हणजे काय?
केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना आहे. या योजनेत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते, ज्यासाठी कोणत्याही मालमत्तेची गरज नाही. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, स्वतःच्या पायावर उभे राहून घराच्या अर्थकारणात हातभार लावण्याची संधी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
कर्ज कोणत्या व्यवसायांसाठी मिळू शकते?
या योजनेअंतर्गत महिलांना बांगड्या तयार करणे, ब्युटी पार्लर, बेडशीट आणि टॉवेल तयार करणे, बुक बाइंडिंग, नोटबुक तयार करणे, चहा आणि कॉफी बनवणे, कापड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, डायग्नोस्टिक लॅब, ड्रायक्लीनिंग, सुक्या मासळीचा व्यवसाय, खाद्यतेल व्यवसाय, पापड निर्मिती अशा विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध होते.
या विविध व्यवसायांमध्ये महिलांना सहजरीत्या तीन लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते, ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमी बनू शकतात. (Small Business Loan Scheme)
महिला उद्योगिनी योजनाचा उद्देश
महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने आणलेली ही योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मोठी संधी देत आहे. महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.