भारतनेट योजना: ग्रामपंचायतींमध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट! तुमच्या गावात आले का?

भारतनेट योजना: ग्रामपंचायतींमध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट! तुमच्या गावात आले का?

Bharat net Scheme: या योजनेअंतर्गत देशातील 2.5 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे काम सुरू आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात इंटरनेटच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देणे आहे. चला, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेऊया.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये सध्या 360 ग्रामपंचायतींपर्यंत भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचले आहे. मात्र, जलजीवन मिशन, स्मार्ट सिटी आणि रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे काही ठिकाणी हे नेटवर्क खंडित झाले आहे. त्यामुळे, सध्या ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. एकदा हे नेटवर्क सुरळीत झाल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या आणि इतर सरकारी कार्यालयांनाही इंटरनेटची सुविधा मिळू शकेल.

जिल्ह्यातील 780 ग्रामपंचायतींना इंटरनेटचा लाभ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 780 ग्रामपंचायतींना या योजनेच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मिळणार आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे आरोग्य केंद्रे, शाळा, पोलिस ठाणी, रेशन दुकान आणि इतर शासकीय कार्यालयांना डिजिटल सेवा दिल्या जातील.

ग्रामीण भागात डिजिटल परिवर्तन
भारतनेट योजनेमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे आरोग्य, शिक्षण, शासकीय सेवा आणि इतर आवश्यक सेवांचा लाभ घेणे सोपे होईल, ज्यामुळे ग्रामविकासाला गती मिळेल.

भारतनेट’ योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान 10 एमबीपीएस आणि नंतर 100 एमबीपीएसपर्यंत बँडविड्थ उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना या इंटरनेटद्वारे ऑनलाइन शिक्षण, आरोग्य सुविधा आणि इतर शासकीय सेवांचा लाभ घेता येईल. विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोठी मदत होईल.Bharat net Scheme

इतरांना शेअर करा.......